bhvs narayana murthy
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी अग्रगण्य असलेल्या संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेचा (डीआयएटी - अभिमत विद्यापीठ) १५ वा दीक्षान्त समारंभ रविवारी (ता. २९) होणार आहे. या समारंभात एकूण ५१८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘डीआयएटी’चे कुलगुरू डॉ. बी. एच. व्ही. एस. नारायण मूर्ती यांनी गुरुवारी दिली.