नवरा-बायकोचं घरच्या हिशोबावरून भांडण; प्रकरण पोहोचलं पोलिसांपर्यंत

टीम ई-सकाळ
मंगळवार, 30 जून 2020

पैशाचा हिशेब विचारला होता. या कारणावरून त्यांच्यात भांडणे झाली होती. या घटनेनंतर तिने तिची बहिण सविता भारस्कर हिला फोन करुन बोलावून घेतले. त्या वेळी तिच्यासमवेत तिचा पती नंदू व मुलगा विकी असे तिघेजण आले. विकीने त्याच्या हातातील लाकडी दांडक्या्ने फिर्यादीला जबर मारहाण करीत त्यास जखमी केले.

पुणे : पती-पत्नीमध्ये पैशाच्या हिशोबावरून झालेल्या भांडणातून पत्नीच्या बहिणीच्या कुटुंबाने पतीसह अन्य लोकांना वीटा, लाकडी दांडक्याीने जबर मारहाण केली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात  परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  ही घटना लोहगाव येथील कलवड वस्तीत घडली. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

याप्रकरणी  परशुराम गाडे (वय 36, रा. लोहगाव) याने दिलेल्या फिर्यादीनूसार विकी नंदु भारस्कर (21), सविता नंदु भारस्कर (36), नंदु वामन भारस्कर ( 45) व कविता गाडे ( 32) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल झाले आहेत. यापैकी भारस्कर कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. गाडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीची पत्नी कविता गाडे हिला त्याने कामावरुन घेतलेल्या पैशाचा हिशेब विचारला होता. या कारणावरून त्यांच्यात भांडणे झाली होती. या घटनेनंतर तिने तिची बहिण सविता भारस्कर हिला फोन करुन बोलावून घेतले. त्यावेळी तिच्यासमवेत तिचा पती नंदू व मुलगा विकी असे तिघेजण आले. विकीने त्याच्या हातातील लाकडी दांडक्या्ने फिर्यादीला जबर मारहाण करीत त्यास जखमी केले. यानंतर त्याने फिर्यादीचा भाऊ संदिप गाडे याच्या घराजवळ जावून त्याची पत्नी व आईला देखील हाताने मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यास आलेला त्यांचा घरमालक, त्याचा मुलगा, त्याचा मित्र या तिघानाही विकीने लाकडी दांडक्याकने मारहाण केली.

आणखी वाचा - पुण्यातील अधिकाऱ्याच्या कामाचं होतंय कौतुक

दरम्यान, या प्रकरणी कविता गाडे यांनी हिने देखील पती व त्याच्या कुटुंबाविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार, पती परशुराम लक्ष्मण गाडे, संदिप लक्ष्मण गाडे (वय 34), अभिषेक भिंगारदिवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी परशुराम गाडेला अटक करण्यात आली आहे. फिर्यादीचे तिच्या पतीशी पैसे न देण्याच्या कारणावरुन भांडण सुरु होती. तेव्हा तीने बहिणीस भांडणे सोडविण्यासाठी  बोलावले. यावेळी तिच्या बहिण्याच्या मुलाला  दिर व सासूने पाठिमागून पकडले.तर पतीने त्याच्या डोक्याडवर वीट मारली. तसेच बहिणीच्या पतीस दिराचा मित्र अभिषेक भिंगारदिवे याने शिविगाळ करीत मारहाण केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: difference over money husband beaten by wife relatives