पुणे : अयोध्या येथील वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे शहरातील विविध संघटनांनी स्वागत केले आहे. दोन्हीही प्रार्थनास्थळे जलदगतीने उभारण्यात यावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाचा निकाल हा समतोल राखणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सर्वसामान्य हिंदू लोक जी अयोध्यासाठी शतकोनशतके लढत होती त्यांचा विजय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखून लवकरात अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहील, अशी अपेक्षा आहे. उशीर झाला असला तरी सर्वांना मान्य होणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मशीद उभारण्यासाठी जागा देण्याची जबाबदारी सरकारची आहे.
- केतन घोडके, जिल्हाध्यक्ष, विश्व हिंदू परिषद
देश एकसंध ठेवायचा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल त्यांचे स्वागत करायचे हे आम्ही पूर्वीच ठरवले होते. न्यायालयाने देखील अगदी समतोल राखणारा निर्णय दिला आहे. वादी आणि प्रतिवादी या दोघांनीही मांडलेल्या मुद्यांच्या योग्य विचार न्यायदान करताना झाला आहे.
- मुश्ताक पटेल, कार्याध्यक्ष, मुस्लीम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट
अयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे मी स्वागत करतो. मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा उपलब्ध करण्याची जबाबदारी सरकारला देण्यात आली आहे. संबंधित जागा योग्य त्या ठिकाणी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच बांधकामासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या देण्यात याव्यात.
- मुन्वर कुरेशी, संस्थापक अध्यक्ष, इंडियन मुस्लीम फ्रंट