esakal | सैनिक बोर्डाचे रखडले डिजिटायझेशन

बोलून बातमी शोधा

Digitization
सैनिक बोर्डाचे रखडले डिजिटायझेशन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सैनिक कल्याण विभागामार्फत माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याची माहिती व अर्ज भरण्यासाठीची सुविधा ऑनलाइन करण्यासाठी शासनाने डिजिटाझेशन प्रणालीच्या वापरावर भर देण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, अद्याप नवीन संकेतस्थळ तयार नसल्यामुळे माजी सैनिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचणी उद्भवत आहेत.

कमांडर (निवृत्त) रवींद्र पाठक यांनी माहिती अधिकाराचा वापर करीत माहिती मागवली होती. याबाबत ते म्हणाले, ‘राज्यातील माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांसाठी सैनिक कल्याण विभागामार्फत असलेल्या विविध योजनांसाठी लागणारे कागदपत्रे हे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व सैनिक कल्याण विभागाला सादर करावे लागतात. परंतु ई-गव्हर्नन्स अंतर्गत सैनिक कल्याण विभाग आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे डिजिटायझेशन आणि ऑनलाइन सेवा प्रणालीचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. त्यात जुने संकेतस्थळ बंद करण्यात आल्यामुळे योजनांची माहिती मिळत नाही.’ नवीन संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी दोन वेळा टेंडर मागविण्यात आले पण त्यावर प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे मंजूर झालेला निधी शासनाला परत करण्यात आला. मागील वर्षी कोरोनामुळे निधी मंजूर झाला नाही. आता ही कोरोनाचे सावट असल्यामुळे निधी मंजूर होण्याची शक्यता कमी आहे. सध्या सिर्फ फाउंडेशनने नवीन संकेतस्थळ तयार करून दिले आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या डीआयटीकडून मंजुरी न मिळाल्याने ते वापरता येत नाही, अशी माहिती सैनिक कल्याण विभागाच्यावतीने देण्यात आली.

हेही वाचा: राज्य सरकारकडून पोलिस पदकं जाहीर; प्रशंसनीय कामगिरीमध्ये पुणे पोलिसांचाही सन्मान

जुने संकेत स्थळ का बंद झाले ?

जुने संकेतस्थळाचे काम हे मेस्कोतर्फे करण्यात आले होते. हे संकेतस्थळ २००२ वापरण्यात येत होते. तसेच हे संकेतस्थळ डॉट कॉम स्वरुपात होते. जिल्हा सैनिक विभागातील काही कारणांमुळे या खासगी संकेतस्थळाला बंद करण्यात आले. असेही सैनिक कल्याण विभागाने सांगितले.

आरटीआईतून मिळालेली माहिती

  • सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळाला पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी जून २०१८ मध्ये चर्चा

  • प्रायोगिक तत्वावर पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठी डिजिटायझेशनचा शासनाचा निर्णय

  • यासाठी शासनाकडून ८८ लाख ५८ हजार निधी मंजूर

काय आहेत अडचणी

  • अद्याप नवे संकेतस्थळाचे काम झाले नाही

  • जुने संकेतस्थळ बंद करण्यात आले

  • माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना विविध योजनांबाबत आणि अर्ज भरण्याच्या समस्या

नव्या संकेतस्थळाचे कार्य पूर्ण झाले आहे. यामुळे आता माजी सैनिकांना माजी सैनिक कार्यालयात धावपळही करण्याची गरज भासणार नाही. कोरोनामुळे संकेतस्थळाला सुरु करण्यासाठीची परवानगी अद्याप मिळाली नाही. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर शासनाच्यावतीने परवानगी मिळाल्यानंतर लगेचच हे संकेतस्थळ सुरु केली जाईल.

- आर. आर. जाधव, लेफ्टनंट कर्नल (निवृत्त), उपसंचालक - सैनिक कल्याण विभाग