‘डिक्की’चे मिलिंद कांबळे यांची बी-२० समितीत निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milind Kamble

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांची बिझनेस २० (बी२०) च्या राष्ट्रीय समितीत निवड करण्यात आली आहे.

Milind Kamble : ‘डिक्की’चे मिलिंद कांबळे यांची बी-२० समितीत निवड

पुणे - दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांची बिझनेस २० (बी२०) च्या राष्ट्रीय समितीत निवड करण्यात आली आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या ‘उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागा’तर्फे नेमण्यात आलेल्या समितीद्वारे ते भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करणार आहेत.टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर हे समितीचे अध्यक्ष असून, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ‘(सीआयआय) चे अध्यक्ष संजीव बजाज, ‘आरपीजी गोएंका’ ग्रुपचे अध्यक्ष संजीव गोएंका यांचा समितीमध्ये समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने ही महत्त्वाची समिती मानली जाते. कांबळे हे सध्या ‘आयआयएम’ जम्मूचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच, केंद्र सरकारच्या विविध समित्यांवरही सल्लागार आणि महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. येत्या वर्षभरात देशात जी-२० आणि बी-२० यांच्याकडून देशभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. इंडोनेशिया (बाली) येथे नुकत्याच झालेल्या बी-२० आंतरराष्ट्रीय परिषदेत ते सहभागी झाले होते.

बी-२० हे जगातील उद्योग समुहाशी संवाद साधण्यासाठी अधिकृत व्यासपीठ आहे. पूर्वनिर्धारित थीमवर धोरण शिफारशी विकसित करणे, हे त्यांचे कार्य आहे. भारताचा सर्वसमावेशक विकास करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

- मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष, ‘डिक्की’

टॅग्स :pune