
मार्केट यार्ड : पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काशिनाथ काळभोर यांनी सोमवारी (ता. ७) पदाचा राजीनामा दिला. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (ग्रामीण) यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला. राजीनामा स्वीकारल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी सांगितले. बाजार समितीची वार्षिक उलाढाल पाच ते सात हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे.