
चाकण - विधानसभा निवडणुकीत खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचा पराभव झाल्यानंतर मोहिते यांना विधान परिषदेवर संधी किंवा मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे. त्यातच भाजपचे राम गावडे यांनीही दिलीप मोहिते यांना मंत्रिपद मिळावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे अजित पवार हे दिलीप मोहिते यांचे राजकीय पुनर्वसन करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.