ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पुणे- ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे आज (शुक्रवार) येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते.

पाडगावकर यांची किडनी निकामी झाली होती. उपचारासाठी त्यांना रूबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे आज निधन झाले. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते अभ्यासक म्हणून परिचीत होते. शिवाय, त्यांचा काश्मीर प्रश्नाबाबतचा अभ्यासही गाढा होता.

पाडगावकर यांचा 1 मे 1944 रोजी जन्म झाला होता. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली होती. फ्रान्समधून दिग्दर्शन व पटकथा लेखन पदवी मिळवली होती. त्यांनी वयाच्या 24 व्या वर्षी पत्रकारितेला सुरुवात केली होती. सन 1978 ते 86 या काळात त्यांनी युनेस्कोमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसेवा अधिकारी म्हणून काम पाहिले होते. फ्रान्सने 2002 मध्ये पाडगावकरांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dilip padgaonkar passes away