शिरूर तालुक्यात वाढतायेत कोरोनाबाधित; मलठणमध्ये सुरु होणार कोव्हिड सेंटर

Dilip Walse Patil instructed District Collector to start Covid Center at a rural hospital in Malthan
Dilip Walse Patil instructed District Collector to start Covid Center at a rural hospital in Malthan
Updated on

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यात कोरोनाबाधित नागरिक दिवसेंदिवस वाढत आहेत. 39 गावांमध्ये औद्योगिक वसाहतीमधील कामगार व नागरीकांची ये-जा होत असल्याने नागरीकांच्या आरोग्यासाठी व कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी मलठण ( ता. शिरूर ) येथील ग्रामीण रूग्णालय येथे कोव्हिड सेंटर सूरू करण्याच्या सूचना राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मलठण (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालयांचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रूग्णालयाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे, आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, राजेंद्र गावडे, योगेश थोरात आदि उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वळसे पाटील म्हणाले की, ''राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू लागला आहे. आरोग्य विभाग व प्रशासन या रोगाला अटकाव आणण्यासाठी प्रयत्नशिल आहे. त्यासाठी नागरिकांनी देखील घरातच राहून प्रशासनाला मदत केली पाहिजे. गावागावातील कार्यकर्त्यांनी गावात कोरोनाला शिरकाव करता येणार नाही. यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले.''
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com