
Dimbha Dam
Sakal
कवठे येमाई : डींभा धरणाचे पाचही दरवाजे रविवारी (ता.२८) पहाटेपासून उघडण्यात आल्याने घोडनदीला मोठा पूर आला. यामुळे बेल्हा -जेजुरी महामार्गावरील चांडोह (ता. शिरूर) व लाखणगाव (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीवरील पूल पाण्याखाली गेल्याने सकाळी साडेआठ वाजल्यापासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.