

Tribal Families at Dimbha Dam Receive 15-Day Eviction Notice
Sakal
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या जागेवर गेल्या ४० वर्षांपासून आदिवासी कातकरी-ठाकर बांधव राहत आहेत. त्यांना अतिक्रमित जागा खाली करण्यास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या डिंभा धरण विभागाने १५ दिवसांची नोटीस दिली आहे. यामुळे ही कुटुंबे बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध नोंदवत अंदोलनाचा इशारा दिला आहे.