
Ghod River Flood
Sakal
पारगाव : डींभा धरण पाणलोट क्षेत्रात काल शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणाच्या पाचही दरवाजातुन आज रविवारी पहाटे पासुन प्रथम २३ हजार , सकाळी २५ हजार व दुपारी ३२ हजार क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणावर घोडनदीत पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने घोडनदीला प्रचंड पुर आला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील गावामध्ये नदी काठावर असलेले शेतांमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीवर असलेले अनेकांचे शेतीपंप पाण्याखाली गेले आहेत लाखणगाव येथील बेल्हा जेजुरी महामार्गावरील पुल पाण्याखाली गेल्याने आज रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून या रस्तावरील वहातुक ठप्प झाली आहे. यावर्षी नदीला पुर आल्याने पुलावरून पाणी वाहु लागल्याने एका महिन्यात दोनदा या रस्त्यावरील वहातुक ठप्प झाली आहे.