esakal | डिंभे धरण १०० टक्के भरले; ३ हजार क्युसेकने विसर्ग सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

डिंभे धरण १०० टक्के भरले; ३ हजार क्लुसेक्सने पाणी सोडले

डिंभे धरण १०० टक्के भरले; ३ हजार क्युसेकने विसर्ग सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलवडे : पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देणारे डिंभे धरण १०० टक्के भरले असून आज दुपारी ३ वाजता ३००० क्युसेकने पाणी घोडनदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभाग मंचरचे उपविभागीय अधिकारी डी. एस. कोकणे यांनी दिली.

पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील आहुपे, पाटण व भीमाशंकर खोऱ्यात तीनचार दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने आज १३ सप्टेंबर रोजी डिंभे धरण १०० टक्के भरले.

दाट धुक्यांनी व कोसळणाऱ्या धबधब्यांनी हा परिसर नयनरम्य दिसत आहे. डिंभे धरणातील पाण्याचा आंबेगाव, जुन्नर, शिरूर तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

loading image
go to top