

Dimbhe Dam Water Release
esakal
मंचर : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) येथून उजव्या कालव्यातून १५० क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कालव्यात पाणी आल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील पन्नासहून अधिक गावांमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उपलब्ध पाण्याचा शेतकरी आणि नागरिकांनी काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.