Dilip Walse Patil and CM Devendra Fadnavis
sakal
घोडेगाव - कुकडी संयुक्त प्रकल्पांतर्गत असलेले आणि या भागातील सर्वात मोठे दगडी धरण असलेल्या डिंभे धरणातून होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील पाणी गळतीबाबत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर प्रश्नाकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे निवेदनाद्वारे तातडीने लक्ष वेधण्यात आले असून धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.