

Traffic came to a standstill on the Belhe–Jejuri Highway after the bridge over the Ghod River at Lakhangaon in Ambegaon taluka was submerged following heavy water discharge from Dimbhe Dam.
Sakal
पारगाव : डींभा धरण भरल्याने धरणाच्या पाचही दरवाजातुन आज सोमवारी सकाळ पासुन घोडनदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने घोडनदीला पुर आला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील गावामध्ये नदी काठावर असलेले शेतांमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीवर असलेले अनेकांचे शेतीपंप पाण्याखाली गेले आहेत लाखणगाव येथील बेल्हा जेजुरी महामार्गावरील पुल पाण्याखाली गेल्याने आज सोमवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून या रस्तावरील वहातुक ठप्प झाली आहे.