

Ganesh Mandal
esakal
ओतूर,: अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होत असताना डिंगोरे येथील श्री शिवछत्रपती गणेश मंडळ कुंभारवाडा यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुष्पावती विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी एक लाख रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला. मंडळाच्या सभासद व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली.