esakal | पुण्यातील या सहा गावांत होणार सरपंचांची थेट निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Sarpanch

जिल्ह्यातील ग्रामपंचायती दृष्टिक्षेपात 

  • १३९९ एकूण ग्रामपंचायती
  • ६२९ आतापर्यंत झालेल्या निवडणूक 
  • ६२९ थेट जनतेतून सरपंच 
  • ०६ होत असलेल्या निवडणूक
  • ७६४ या वर्षात निवडणूक होणारी गावे

पुण्यातील या सहा गावांत होणार सरपंचांची थेट निवड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील अवघ्या सहा गावांचा समावेश आहे. या गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सहा मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद केली असली तरी या सहा गावांचे सरपंच मात्र थेट जनतेतूनच निवडले जाणार आहेत. अशा पद्धतीने थेट सरपंच निवडली जाणारी जिल्ह्यातील ही शेवटचीच सहा गावे ठरणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यात पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्‍यातील मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्‍यातील आस्करवाडी आणि भिवरी आणि दौंड तालुक्‍यातील बिरोबावाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

तत्कालीन राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता, त्यासाठी ग्रामपंचायत कायद्यात दुरुस्तीही केली होती. यानुसार आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील ६२९ गावांचे सरपंच थेट जनतेतून निवडले गेले आहेत. नव्या सरकारने सरपंचांची निवड ही ग्रामपंचायत सदस्यांमधूनच बहुमताच्या आधारावर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाबाबतचा वटहुकूम काढण्यास राज्यपालांनी नकार दिला आहे, त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा ग्रामपंचायत कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे. संबंधित दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना रक्कम अदा झाल्यास त्याबाबत राज्य सरकारला कळविण्यात यावे, असा आदेश अतिरिक्त सचिव प्रल्हाद रोडे यांनी दिले आहेत.

loading image