
पुणे : अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या पदविकेच्या (पाॅलिटेक्नीक) थेट व्दितीय वर्षाच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने आॅनलाईन प्रक्रियेचा प्रारंभ आजपासून (ता. १७) केला आहे. २८ आॅगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
तंत्रशिक्षण विभागातर्फे इयत्ता १०वी नंतर तीन वर्षाच्या तंत्रनिकेतन पदविसाठी प्रवेश दिलेले असते असतात. पण दरवर्षी १० टक्के प्रवेश हे इतर तंत्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. इयत्ता १०वी नंतर विज्ञान शाखेत १२वी उत्तीर्ण होणारे, किंवा व्होकेशनल कोर्स करणारे किंवा १०वी नंतर २ वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश दिला जातो.
तसेच खासगी संस्थांमध्ये असलेल्या रिक्त जागांवरही या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी व गुणवत्ता यादी पहाण्यासाठी https://dsd20.dtemaharashtra.org या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाने केले आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्रवेशासाठीचे वेळपत्रक पुढीलप्रमाणे :
अर्ज भरण्यासाठीची मुदत : १७ ते २७ आॅगस्ट
कालावधीत कागदपत्र पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती : १८ ते २७ आॅगस्ट
तात्पुरती गुणवत्ता यादी : ३० आॅगस्ट
गुणवत्ता यादीत तक्रार करणे : ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबर
अंतिम गुणवत्ता यादी : ४ सप्टेंबर
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.