पुणे : शहर पोलिस दलातील 41 पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांना "पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह' जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune city police

पुणे : शहर पोलिस दलातील 41 पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांना "पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह' जाहीर

पुणे : महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला पोलिस दलातील उल्लेखनिय सेवेसाठी राज्याच्या गृह विभागाकडून "पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदक' जाहीर करण्यात आले. त्यामध्ये शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, पाच पोलिस निरीक्षकांसह 41 पोलिसांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले. तर दोन पोलिसांना 2018-19 या वर्षासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट प्रशिक्षक पदक जाहीर झाले आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, मनिषा झेंडे, हेमंत पाटील, विजय कुंभार, संदीप भोसले, प्रकाश पासलकर यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदक जाहीर झाले आहे. याबरोबरच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण शिर्के, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद माने, प्रवीण केंकरे, कैलास डाबेराव, रवींद्र राऊत, नंदकुमार मरकड, शेखर कोळी, सचिन नाझरे, प्रदीप सुर्वे, मोहन माळी, संजय कराळे, पोलिस हवालदार स्मिता अमोंडकर, दिगंबर सपकाळ, कुंदन शिंदे, संदिप काकडे, प्रशांत काकडे, योगराज घाडगे, प्रशांत बोऱ्हाडे, तुषार खडके,

सुदर्शना म्हांगरे, प्रमोद मगर, अजय थोरात, राहूल शितोळे, शैलेश सुर्वे, दयानंद कुंभार, राजस शेख, देवानंद सुर्यवंशी, पोलिस नाईक निलेश देसाई, संदिप राठोड, आकाश फासगे, अमोल पवार, जगदीश कस्तुरे, संग्राम शिनगारे, रणजित शिंदे यांनाही पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करुन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला आहे. याबरोबरच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले वैभव गायकवाड व पोलिस आयुक्तालयात नेमणुकीस असलेले धनंजय कदम यांना 2018-19 या वर्षासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट प्रशिक्षक पदक जाहीर झाले आहे.

"सीआयडी'चे रंजनकुमार शर्मा यांच्यासह तीन पोलिसांचाही सन्मान

गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) पोलिस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलिस हवालदार मनोज पांढरे, पोलिस हवालदार मच्छिंद्र भंडारी, पोलिस हवालदार किरण कुलकर्णी यांनाही पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदक जाहीर झाले आहे.

Web Title: Director General Police Honors 41 Police Personnel Officers City Police Force Home Department Announces Names Police Officers Staff Maharashtra Day

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top