esakal | कोथरुड विधानसेभच्या उमेदवारीवर प्रविण तरडेंचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

Director Pravin Tarade released Diwali Ank of SarkarNama web portal

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मला एका खुप मोठ्या नेत्याचा फोन आला. मी फोन घेतल्यावर समोरचे नाव ऐकून बसलेल्या जागेवरून तडकन उठून उभा राहीलो. त्यांनी मला कोथरूडमधून निवडणूक लढविण्याचे सांगितले, असे अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितले. त्यावेळी मला काही वेळासाठी आमदार झाल्यासारखे वाटले, असेही त्यांनी सांगितले.

कोथरुड विधानसेभच्या उमेदवारीवर प्रविण तरडेंचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मला एका खुप मोठ्या नेत्याचा फोन आला. मी फोन घेतल्यावर समोरचे नाव ऐकून बसलेल्या जागेवरून तडकन उठून उभा राहीलो. त्यांनी मला कोथरूडमधून निवडणूक लढविण्याचे सांगितले, असे अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितले. त्यावेळी मला काही वेळासाठी आमदार झाल्यासारखे वाटले, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामा या वेब पोर्टलच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चेविषयी भाष्य केले. कोथरूड येथील बालशिक्षणच्या एमईएस ऑडिटोरियममध्ये सरकारनामाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले.

खडकवासला आणि कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढण्यासंदर्भातात झालेल्या चर्चेवर भाष्य करत, भविष्यात निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले. मात्र, निवडणुकीसाठी माझे मैदान तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.