पुणे - शिक्रापूर येथील गणेश ज्वेलर्सचे मालक आणि वाई अर्बन को-ऑप बँकेच्या तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांनी संगनमत करून व्यावसायिकाची ६१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.