Pashan Lake : पाषाण तलावात घाण पाणी व जलपर्णीचे साम्राज्य

पाषाण तलावात रामनदीद्वारे वरच्या भागातून येणारे घाण पाणी व जलपर्णीची वारंवार होणारी वाढ यामुळे पाषाण, सुतारवाडी परिसरात दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
Pashan Lake Jalparni
Pashan Lake JalparniSakal
Summary

पाषाण तलावात रामनदीद्वारे वरच्या भागातून येणारे घाण पाणी व जलपर्णीची वारंवार होणारी वाढ यामुळे पाषाण, सुतारवाडी परिसरात दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

औंध - पाषाण तलावात रामनदीद्वारे वरच्या भागातून येणारे घाण पाणी व जलपर्णीची वारंवार होणारी वाढ यामुळे पाषाण, सुतारवाडी परिसरात दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढत असून, यामुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. पुणे शहरातील एकेकाळी महत्त्वाचा असलेला पाषाण तलाव आज घाण पाणी व जलपर्णीच्या विळख्यात सापडल्याने तलावाची दुर्दशा झाली आहे. रामनदी पात्रात सोडलेल्या घाण पाण्यामुळे तलावाचे सौंदर्य लयाला जात आहे. मागील काही वर्षांपासून तलावात जलपर्णीच्या वाढीमुळे छोटे जीव व मासे यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षांचा संचार असलेल्या या तलावात प्रदुषण वाढत चालल्याने व खाद्य कमी झाल्याने त्यांनीही इकडे पाठ फिरवली आहे. तलावाशेजारीच असलेल्या सुतारवाडी परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून ते त्रस्त झाले आहेत. रामनदीतून तलावात येणाऱ्या सांडपाण्यावर पालिकेने नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

परंतु यावर काहीच उपाययोजना होत नसल्याने ही समस्या कायम आहे. जलपर्णीच्या अनियंत्रित वाढीमुळे तलावात हिरव्या रंगाचे आच्छादन तयार झाले असून, पर्यावरणासह मानवी आरोग्यासाठी हे हानिकारक आहे. तलावात जमा होणारे हे पाणी पुढे बाणेर, औंध मार्गे मुळा नदीच्या पात्रात मिसळत असल्याने प्रदुषणात भर पडत आहे. एकेकाळी पर्यटनासाठी महत्त्वाचे ठिकाण व पक्ष्यांचा अधिवास असलेला पाषाण तलाव दुर्गंधी व घाणीचे केंद्र बनले आहे. एकीकडे पालिकेकडून जलपर्णीच्या नियंत्रणासाठी कर्मचा-यांच्याकडून सफाई केली जाते परंतु हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. महत्वाचे म्हणजे जलपर्णीच्या वाढीस कारणीभूत ठरणारे व नदीत थेट सांडपाणी सोडणारांवर कठोर कारवाई केली जावी. तसेच पालिकेच्या माध्यमातून एखादा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे.

कोट्यावधी रुपयाचा खर्च जलपर्णी काढण्यासाठी केला जातो त्याऐवजी वरील परिसरात एखादा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला तर ही समस्या कायमस्वरूपी सुटेल अशी सुचनाही नागरिकांनी केली आहे.

प्रतिक्रिया :-

१) विधाते वस्ती ते पाषाण तलावापासून वरच्या बाजूला पाचशे मीटर पर्यंत अंदाजे चार किलो मीटरची नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला आहे. यामुळे नदीत येणारे घाण पाणी थांबले जाईल.

- बसवराज कलशेट्टी, कनिष्ठ अभियंता (ड्रेनेज) औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय.

२) तसेच तलाव स्वच्छ झाल्यावर सातत्याने वापरात राहिल यासाठी बोटींग सुरू करावे जेणेकरुन तलावात घाणही होणार नाही व स्थानिक युवकांना रोजगारही मिळेल. येणाऱ्या उत्पन्नातुन तलावाची स्वच्छतेचा खर्च सुद्धा जाईल. तसेच पुर्वीप्रमाणे पक्षांचे थवे पुन्हा एकदा तलावाकडे येतील व यामुळे तलावाच्या वैभवात भर पडेल.

- महेश भिमराव सुतार, रहिवासी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com