किरकटवाडीत घरोघरी गढूळ पाणी

किरकटवाडी गावात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पिण्याचे पाणी अत्यंत गढूळ येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
water
waterkirkatwadi

किरकटवाडी : किरकटवाडी गावात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पिण्याचे पाणी अत्यंत गढूळ (Dirty water) येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. फिल्टर पाणी (Filtered water) विकत घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाजवळ असलेल्या ‘वॉटर एटीएम’वर दिवस-रात्र नागरिकांची रांग दिसून येत आहे. पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी नागरिकांना पैसे खर्च करावे लागत आहेत. (Dirty water from house to house in Kirkatwadi)

किरकटवाडी गावाला नांदेड गावच्या हद्दीत असलेल्या एका विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. विहिरीत जमा झालेल्या पाण्यात केवळ जंतुनाशक पावडर टाकली जाते, इतर कोणतीही प्रक्रिया न होता हे विहिरीचे पाणी टाकीत व टाकीतून नळावाटे थेट घरोघरी जाते. सध्या धरणातील पाणी अत्यंत गढूळ झालेले आहे. अक्षरशः कधी न पाहिलेला तांबड्या मातीचा रंग पाण्याला आलेला दिसत आहे. हेच धरणाचे पाणी निचरा होऊन विहिरीत येत असल्याने घरोघरी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.

water
पूजा चव्हाणशी झालेल्या संभाषणामधील 'तो' आवाज संजय राठोड यांचाच!

नळाला येणारे पाणी पिण्यासाठीच काय पण वापरण्यासाठीसुद्धा योग्य दिसत नाही. त्यामुळे नागरिक पैसे खर्च करून पाणी विकत घेताना दिसत आहेत. लहान मुले, महिला, पुरुष, वृद्ध असे सर्वच पाणी विकत घेण्यासाठी रांगेत थांबत आहेत. रात्री १२ ते १ वाजेपर्यंत पाण्यासाठी रांग दिसून येते. ''देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, परंतु आम्हाला अजून पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही’, अशा शब्दांमध्ये नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करत आहेत.

वॉटर एटीएम वरील पाण्याचे दर

एक लिटर : १ रुपया

दहा लिटर : ५ रुपये

वीस लिटर : १० रुपये

रस्त्यावरच्या डबक्यात जसे गढूळ पाणी असते तसे आजकाल नळाला पाणी बघायला मिळत आहे. वॉटर एटीएमवर लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. तासनतास रांगेत उभे राहून, पैसे देऊनपण पाणी मिळत नाही.

- योगिता बागणीकर, आपलं घर सोसायटी, किरकटवाडी

नळाचे पाणी एव्हढे गढूळ येते की मैत्रिणी ते पाणी कपात ओतून फोटो पाठवतात आणि खाली उपरोधिकपणे ‘चहा घ्यायला या’, असे लिहितात. प्रशासनाने काहीतरी व्यवस्था करायला हवी.

- स्वाती कदम, अर्बन ग्राम सोसायटी, किरकटवाडी

नागरिक अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा लवकर उपलब्ध व्हाव्यात व त्यानंतरच नवीन कर आकारणी करण्यात यावी.

- विकास हगवणे, रहिवासी, किरकटवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com