esakal | वीर धरणातून १३९०४ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

veer dam

वीर धरणातून १३९०४ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परिंचे : वीर (ता. पुरंदर) धरणातून शनिवारी पहाटे दोन वाजता एक दरवाजा उचलून धरणात विसर्ग सुरू करण्यात आला होता. पहाटे सहा वाजता धरणाचे पाच दरवाजे चार फुटाने उचलून २१५०५ क्युसेक्स पाणी निरा नदी पात्रात सोडण्यात आले होते. पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली दुपारी तीन वाजता धरणातून १३१०४ क्युसेक व विद्युत गृहातून ८०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. वीर धरणातून (veer dam) एकूण १३९०४ क्युसेक्स पाणी नीरा नदी (neera river) पात्रात सोडण्यात आले असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रिक यांनी सांगितले. (Discharge water Veer Dam started 13904 thousand cusecs)

शनिवार (दि.२४) रोजी सकाळी अकरा वाजता घेतलेल्या आकडेवारीनुसार वीर धरण ८९.६९ टक्के भरले आहे धरणात ८.८६ टीएमसी पाणी साठा झाला आहे. धरणाची पाणी पातळी १८९९.५० इतकी आहे.गेल्या वर्षी या दिवशी धरणात ४ टीएमसी म्हणजे ३८.८७ इतका पाणीसाठा होता. भाटघर धरणात १२.९ टीएमसी पाणी साठा झाला असून धरण ५४ टक्के भरले आहे. गेल्यावर्षी या दिवशी धरणात ९.०१ टीएमसी म्हणजे ३८.०३ टक्के पाणी साठा झाला होता. निरा देवघर धरणात ९.४ टीएमसी म्हणजे ७९ टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्यावर्षी या दिवशी धरणात ३ टीएमसी म्हणजे २३.८० टक्के पाणी साठा होता. गुजवणी धरणात २.९ टीएमसी म्हणजे ७९.५० टक्के पाणी साठा झाला आहे.

हेही वाचा: आळेफाटा : बसस्थानक बनले कचरा डेपो

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा दिवस आधी वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला असल्याचे संभाजी शेडगे यांनी सांगितले. यावेळी अरुण भोसले, कालिदास तावरे आदी कर्मचारी उपस्थित होते. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले.

हेही वाचा: शंभर विद्यार्थ्यांनी पूर्ण केला ‘रिसर्च एथिक्स’चा अभ्यासक्रम

नीरा नदी खोऱ्यात पावसाची रिपरिप सुरू असून, नीरा नदीवरील धरण साखळी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाणलोट क्षेत्रात अनेक ओढ्याचे पाणी नदीपात्रात येत आहे. गुंजवणी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून वेळवंडी व कानंदी नद्यांमधून मोठ्या प्रमाणात नीरा नदीपात्रात पाणी येत आहे. येणारा प्रवाह असाच सुरू राहिल्यास नदी पात्रात आणखी विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले.

loading image
go to top