अतीप्रकाशमान दुर्मीळ सुपरनोव्हाचा शोध

अवकाशाच्या खोलवर स्कॅनिंगमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरवातीच्या विश्वाबद्दल हे संशोधन झाल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने म्हटले आहे.
Supernova
SupernovaSakal

पुणे - विश्वाच्या अगदी सुरवातीच्या जडणघडणीवर प्रकाश टाकणारे अवकाशीय घटक म्हणून सुपरनोव्हांकडे (Supernova) पाहिले जाते. अत्यंत प्रकाशमान, हायड्रोजनची कमतरता असलेला आणि वेगाने विकसित होणाऱ्या सुपरनोव्हाचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी (Indian Scientist) घेतला आहे. या सुपरनोव्हाला एका न्यूट्रॉन ताऱ्यापासून ऊर्जा मिळत असून त्यातून बाहेर पडणारे अतीशक्तीशाली चुंबकीय लहरींचे निरीक्षणही शास्त्रज्ञांनी मिळविले आहे. (Discovery of a Rare Super Bright Supernova)

अवकाशाच्या खोलवर स्कॅनिंगमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरवातीच्या विश्वाबद्दल हे संशोधन झाल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने म्हटले आहे. नैनिताल येथील आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झरवेशनल सायन्सेस (एआरआयईएस) च्या शास्त्रज्ञांना २०२०च्या फेब्रुवारी महिन्यात प्रथम या घटनेसंबंधी नोंद घेतली. कॅलिफोर्नियातील झ्विकी ट्रान्झियंट फॅसिलीटीच्या माध्यमातून एसएन२२०एएनके नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सुपरनोव्हाची निरीक्षणे मिळाली. डॉ. एस.बी.पांडे यांचा संशोधक विद्यार्थी अमित कुमार यांच्या नेतृत्वात हे संशोधनझाले. मंथली नोटीस ऑफ दी रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या शोधपत्रिकेत हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

सुपरनोव्हा म्हणेज...

मराठी अतीनवतारा असे पर्यायी नाव असलेला सुपरनोव्हा हा प्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्याचा स्फोट आहे. हा नवताऱ्यांपेक्षा अधिक ऊर्जा अवकाशात मुक्त करतो.

हा सुपरनोव्हा विशेष का?

अतीप्रकाशमान असलेल्या या सुपरनोव्ह अत्यंत दुर्मिळ घटना आहे. त्यांना सुपरल्युमिनसन्स सुपरनोव्हा म्हणून ओळखले जाते. आपल्या सुर्यापेक्षा २५ पटींनी अधिक वस्तूमान असलेल्या ताऱ्यातून असे सुपरनोव्हा तयार होतात. आपल्या आकाशगंगेतच नव्हे तर विश्वातील इतर आकाशगंगेतही असे सुपरनोव्हा दुर्मिळ आढळतात. आतापर्यंत असे १५० सुपरल्युमिनिसन्स सुपरनोव्हा आढळले आहे.

भारतीय दुर्बिनींचा वापर

देवस्थळ ऑप्टीकल टेलिस्कोप, संपुर्णानंद टेलिस्कोप आणि हिमालयन चंद्रा टेलिस्कोपचाही वापर शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी केला आहे. दृष्य प्रकाश किरणांच्या माध्यमातून निरीक्षणे घेण्यासाठी या दुर्बिनी वापरण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com