esakal | सह्याद्रीतील नव्या बांबूच्या जातीचा शोध; आघारकर संशोधन संस्थेचे संशोधन

बोलून बातमी शोधा

सह्याद्रीतील नव्या बांबूच्या जातीचा शोध; आघारकर संशोधन संस्थेचे संशोधन

सह्याद्रीतील नव्या बांबूच्या जातीचा शोध; आघारकर संशोधन संस्थेचे संशोधन

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे : जैवविविधतेनी परिपूर्ण असलेल्या पश्‍चिम घाटात बांबूच्या नव्या जातीचा शोध लावण्यात शास्त्रज्ञाना यश मिळाले आहे. पुण्यातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी तेताली यांच्या मार्गदर्शानाखाली आघारकर संशोधन संस्थेतील (एआरआय) वनस्पतीशास्त्रज्ञांनी या नव्या जातीचा शोद लावत त्यास ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे नाव देण्यात आले आहे.

पश्‍चिम घाटात आढळणाऱ्या या नव्या बांबूच्या जातीविषयाचे संशोधन नुकतेच 'फायलोटॅक्सा’ या शोधपत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनात डॉ. पी तेताली, डॉ. इ एम मुरलीधरण आणि आघारकर संशोधन संस्थेतील सुजाती

तेताली, सारंग बोकील, रितेश कुमार चौधरी आणि मंदार दातार या

शास्त्रज्ञांचा सहभाग होता. या संदर्भात डॉ. तेताली म्हणाले, ‘‘मेस आणि माणगा या दोन जातीचे बांबू सह्याद्रीत आहेत. मात्र या दोन्ही जातींना वर्षानुवर्षे ‘सूडोक्सीटेनॅन्थेरा स्टॉकसी’ याच नावाने ओळखले जात होते. परंतु सह्याद्रीतील स्थानिकांकडून दोन नावे वापरली जात होती. बांबूला दरवर्षी फुलं येत नाही. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने या दोन्हीचे विश्‍लेषण करणे कठीण होते. मात्र काही कारणांमुळे बांबू वनस्पतीत ‘स्पोरॅडीक

फ्लावरिंग’ची (तुरळक फुले येणे) शक्यता असते. अशाच कारणांमुळे या नव्या जातीमध्ये देखील फुले आल्यामुळे याचा विश्‍लेष्णात्मक अभ्यास करणे अधिक सोपे झाले. अशा पद्धतीने दोन्ही जातीत्या बांबूमध्ये फुले आल्यामुळे मेसचे शास्त्रीय नाव केवळ बदलण्यात आले. तसेच मेसच्या जातीला ‘सूडोक्सीटेनॅन्थेरा माधवी’ असे नाव देण्यात आले आहे.’’ गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही बांबूच्या जातींना वनस्पती

हेही वाचा: पोटची मुलं गेली पण आजी खचली नाही; नातवांसाठी राबण्याची जिद्द वाखाणण्याजोगी

शास्त्रीयदृष्टीने एकच मानले जात होते. मात्र, स्थानिकांना यातील फरक माहिती होता. वनस्पतींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी त्यांची फुले किंवा डीएनए बारकोडचा उपयोग केला जातो. कोणत्याही वनस्पतीचे वर्गीकरण करण्यासाठी त्याच्या फुलांचा अभ्यास महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे मेस व माणगा यातील नेमका फरक समजून घेण्यासाठी त्यांच्या फुलांचा अभ्यास करण्यात आला.

‘‘गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक बांबूवर मी अभ्यास करत आहे. तसेच शेतकऱ्यांना बांबूच्या लागवडीसाठी मदत करत असताना तसेच त्यांच्याशी चर्चा करताना मेस आणि माणगा यातील फरक लक्षात आला. दरम्यान या दोन्ही बांबूला लागणाऱ्या फूलांचा अभ्यास केल्यावर त्यातील फरक स्पष्ट आला. तसेच मेस या वनस्पतीला नवीन नाव देता आले. अशे अनेक बांबूच्या जाती आहेत ज्यांचा

अभ्यास करण्याची आवश्‍यकता आहे.’’

- डॉ. पी तेताली, वरिष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ

‘सूडोक्सीटेनॅन्थेरा माधवी’ची वैशिष्ट्ये

- मेस हे पोकळ असून माणगा थोडा भरीव बांबू आहे

- स्वस्त आणि गुणवत्ता चांगली असल्यामुळे याचा वापर बांधकाम क्षेत्रात याचा वापर

- अनेक शेतकऱ्यांकडून याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते

- फर्निचरसाठी या प्रकारच्या बांबूची मागणी

- विविध गोष्टींमध्ये वापर होणाऱ्या बांबूमधील सुमारे ९० टक्के मेस बांबू आहे