esakal | अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी चर्चा मग निर्णय; शिक्षण मंत्र्यांनी घेतली बैठक

बोलून बातमी शोधा

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी चर्चा मग निर्णय; शिक्षण मंत्र्यांनी घेतली बैठक
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी चर्चा मग निर्णय; शिक्षण मंत्र्यांनी घेतली बैठक
sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : इयत्ता १० वीची परीक्षा रद्द केल्याने पुढील वर्षी होणारे इयत्ता ११वीचे प्रवेश कशा पद्धतीने केले जातील यासंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यानी वरिष्ठ अधिकारी व राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. शिक्षण क्षेत्रातील इतर घटकांशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनामुळे महाराष्ट्र शासनाने इयत्ता १०वीची परीक्षा रद्द केली तर १२वीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता ११वीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन होतात, त्यामुळे यंदा प्रवेशाचा कटऑफ कसा असेल, हुशार मुलांवर अन्याय होईल अशी भावना व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागानेही ११वी प्रवेशाच्या मुद्द्यावर लगेच बैठका सुरू केल्या आहेत. वर्षा गायकवाड यांनी बुधवारी (ता. २१) ११ वी प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकारी, राज्य शिक्षण मंडळ सल्लागार समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन त्यावर चर्चा केला. यामध्ये ११ वीची प्रवेशाच्या निर्णयासाठी ही पहिलीच बैठक आहे.

हेही वाचा: पुण्यात आता देशीदारूही मिळणार घरपोच!

ही प्रक्रिया निष्पक्ष आणि योग्य पद्धतीने केली जाईल. यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने निर्णय घेण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी चर्चा केली जाईल, असे ट्विट गायकवाड यांनी केले आहे.

‘‘१०वीचा निकाल व ११वीचे प्रवेश यावर आज शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली. मुलांच्या भविष्याचा विचार करून योग्य पद्धतीने निकाल लावण्यासाठी चर्चा सुरू आहे, काही पर्याय देखील समोर आलेले आहेत. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून निकाल लावला जाईल. त्याबाबत लवकरच परिपत्रक काढले जाईल. तसेच ११वी प्रवेशासाठी विविध घटकांशी चर्चा करून ही पद्धत निश्‍चीत केली जाणार आहे.’’

- विशाल सोळंकी, आयुक्त, शिक्षण विभाग