esakal | पुण्यात आता देशीदारूही मिळणार घरपोच!

बोलून बातमी शोधा

liquor
पुण्यात आता देशीदारूही मिळणार घरपोच!
sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : वाईन, बिअर, व्हिस्की, रमसह देशी दारूहीचीही आता होम डिलिव्हरी करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मद्याची वाहतूक करताना अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. वाईन शॉपमधूनही घरपोच मद्य ग्राहकांना मिळणार आहे.

राज्य सरकारने ब्रेक द चेन चे आदेश काढताना मद्यविक्री होम डिलिव्हरी मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने आदेश प्रसिद्ध केले नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी होम डिलिव्हरी सुरू झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी आदेश प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार आता वाईन शॉप, बिअर शॉपी (एफएल २), बिअर बार (फॉर्म ई), वाईन शॉपी (फॉर्म ई २), देशा दारू (सीएल ३) आता ग्राहकांना होम डिलिव्हरीच्या माध्यमातून घरबसल्या मिळणार आहे. मूळ किंमतीत (एमआरपी) ही मद्यविक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. बारमधून या पूर्वीच होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा: पुण्यातील तरुणाचा ‘अन्नपूर्णा’वर झेंडा

नागरिकांनो, गांभीर्य ओळखा ! वेळेतच खरेदी करावाईन शॉप्स, बिअर शॉपी, देशी दारू दुकानदारांनी त्यांचा मोबाईल क्रमांक दुकानावर लावायचा आहे. त्यावर ग्राहकांनी संपर्क साधून आपली ऑर्डर नोंदवायची आहे. व्हॉटसअपवर जरी संपर्क साधला तरी, ग्राहकांना घर बसल्या त्यांची ऑर्डर मिळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत दुकानांत जाऊन मद्यखरेदी करायची नाही तसेच दुकानही विक्रीसाठी उघडायचे नाही, असे राज्य सरकारने बजावले आहे. दुकानदारांनी त्यांच्याकडे कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांची उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांकडे नोंदणी करायची आहे. त्यांच्यामार्फतच ग्राहकांकडे ऑर्डर पुरविली जाणार आहे. तसेच ग्राहकांकडे मद्य सेवन करण्याचा परवाना आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना डे लायसन (एक दिवसांचा मद्य सेवनाचा परवाना) पाच रुपयांत घ्यावे लागणार आहे. संबंधित वाईन शॉपमधूनही डे लायसन ग्राहकांना मिळेल. राज्य सरकारच्या आदेशांनुसार पुण्यात घरपोच मद्यविक्री अनेक ठिकाणी सुरू झाली आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिली.

मात्र, घरपोच डिलिव्हरीसाठी काही व्यावसायिकांनी मंगळवारी वाईनशॉप उघडल्यावर तेथे ग्राहकांची गर्दी झाली होती. मात्र, दुकानातून पार्सलही मिळणार नसल्याचे व्यावसायिकांनी स्पष्ट केल्यावर गर्दी कमी झाली. तर काही ठिकाणी गर्दीमुळे दुकाने बंद करावी लागली. दरम्यान मद्य घरपोच पोचविण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी सशुल्क पोलिस बंदोबस्त मिळावा, अशी सूचना वाईन शॉप असोसिएशनतर्फे अजय देशमुख यांनी केली आहे. एका दुकानावर गृहरक्षक दलाचे दोन जवानही बंदोबस्तासाठी पुरेसे ठरतील. त्याचे शुल्क संबंधित दुकानदार पोलिस आयुक्त कार्यालयात जमा करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: नागरिकांनो, गांभीर्य ओळखा ! वेळेतच खरेदी करा