esakal | SPPU : निवृत्तीनंतर नियुक्तीबाबत शनिवारी रंगणार चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

SPPU

SPPU : निवृत्तीनंतर नियुक्तीबाबत शनिवारी रंगणार चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्राध्यापकांच्या निवृत्तीनंतर त्यांना वेतनाऐवजी पेन्शन मिळणे, कार्यालयीन पद सोडावे लागते, हे अगदी सहाजिकच आहे. परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही प्राध्यापकांना निवृत्तीनंतरही ‘इमिरिटस्‌’ म्हणून नियुक्त केल्याने ‘लॉटरी’ लागली आहे. इमिरिटस प्राध्यापकांच्या नियुक्तीसह ऑनलाइन परीक्षांवर झालेल्या खर्चावर विद्यापीठाच्या शनिवारी (ता. २५) होणाऱ्या अधिसभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठातील काही प्राध्यापक निवृत्त झाले आहेत. त्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना निवृत्त करणे आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठाकडे असणाऱ्या या प्राध्यापकांना निरोप देण्याची इच्छा विद्यापीठ प्रशासनाची नसल्याचे चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठात काही प्राध्यापकांची इमिरिटस म्हणून सेवेत रुजू झाले असून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च विद्यापीठ फंडातून केला जात आहे.

हेही वाचा: पवार सेनेचे नेते नाहीत, गितेंच्या वक्तव्यावर राऊत म्हणतात...

या प्राध्यापकांवर एवढा खर्च करण्याची आवश्यकता आहे का?, असा प्रश्न अधिसभा सदस्य शशिकांत तिकोटे यांनी उपस्थित केला आहे. लॉकडाउनमुळे विद्यापीठाला ऑनलाइन परीक्षा घ्यावा लागल्या. मात्र, त्यामुळे विद्यापीठाकडे परीक्षा शुल्कातून किती रुपये रक्कम जमा झाली, तसेच परीक्षेत खर्च किती झाला, यावरही अधिसभेत चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

loading image
go to top