esakal | राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करा : शिवसंग्राम
sakal

बोलून बातमी शोधा

pune

राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करा : शिवसंग्राम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य मागासवर्ग आयोगावर मराठा विरोधी सदस्य असल्याचा आरोप करीत हा आयोग तातडीने बरखास्त करावा. तसेच, मंत्रिमंडळाच्या मराठा विषयक उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करावी, अशा विविध मागण्या शिवसंग्राम संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकविण्याबाबत मंत्रिमंडळाच्या मराठा विषयक उपसमितीचे अध्यक्ष चव्हाण यांनी मराठा समाजाची निराशा केली आहे. जे विषय राज्य सरकारच्या पूर्णतः हातात आहेत, त्याबाबतही चव्हाण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. चव्हाण यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी. तसेच, राज्य मागासवर्ग आयोगावर सर्व मराठा विरोधी सदस्यांचा भरणा असून, हा आयोग तातडीने बरखास्त करावा. राज्य सरकारने ओबीसींप्रमाणे मराठा समाजालाही सर्व सवलती लागू कराव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

हेही वाचा: कोहलीचा 'विराट' विश्वविक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

या धरणे आंदोलनात शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, प्रदेश सचिव शेखर पवार, शहराध्यक्ष भरत लगड, प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीता घुले, महिला शहराध्यक्षा कालिंदी गोडांबे, युवक शहराध्यक्ष नितीन ननावरे, समीर निकम, कल्याण अडागळे, विनोद शिंदे, किशोर मुळूक, बाळासाहेब चव्हाण, निशा गायकवाड, सुरेश थोरात, अभिजित म्हसवडे, भरत फाटक, अमित शिंदे, सागर फाटक, सुजाता ढमाले, दिलीप पेठकर, लहू ओहोळ, केशव बालवडकर, चेतन भालेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मराठा आरक्षणाबाबत काही वर्षांपासून पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप कायम आहे. मराठा समाजाच्या समस्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी.

- तुषार काकडे, प्रदेश प्रवक्ता, शिवसंग्राम

loading image
go to top