Kasba Bypoll Election: निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या बड्या नेत्यामध्ये नाराजी? प्रचाराकडे फिरवली पाठ Displeasure in the big leader of BJP in the face of elections Girish Bapat and Sanjay kakde not joining kasba bypoll election campaign | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll Election

Kasba Bypoll Election: निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या बड्या नेत्यामध्ये नाराजी? प्रचाराकडे फिरवली पाठ

कसबा पोटनिवडणुकीत भाजपची अंतर्गत नाराजी समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रक काढून पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सहभागी होणार नसल्याचं पत्रक जाहीर केलं आहे. या दोन्ही बड्या नेत्यांच्या गैरहजेरीची चर्चा रंगली आहे.

खासदार गिरीश बापट यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला उपस्थित राहणार नसल्याचं जाहीर केलं आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत असल्याने डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला त्यांना दिला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी वैयक्तिक रित्या मतदारसंघात प्रचार करु शकणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत त्यांनी एक अधिकृत पत्रक जाहीर केलं आहे.

काय लिहालं आहे पत्रकात?

प्रति

सर्व पत्रकार बंधू भगिनी

प्रिंट आणि इले्ट्रॉनिक मीडिया

दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. गेले ३ महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी खूप काम कमी केले असून मला सद्ध्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. वरील कारणास्तव सदर पोटनिवणुकीसाठी मी वैयक्तिक रित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाही.

गिरीश बापट

खासदार, पुणे शहर.

तर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात तब्बल 7 तास बैठक घेतली आहे. एकीकडे पुण्यात प्रचाराचा धुरळा उडत असतानाच दुसरीकडे भाजपची कल रात्री एक महत्वाची बैठक पार पडली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीस चार मंत्री उपस्थित राहिले होते. तब्बल सात तास ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुण्यातील विविध महत्वाच्या घटकातील प्रमुख लोकांची उपस्थिती दिसून आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत व्यापारी वर्गातील काही दिग्गज मंडळींचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील कसबा पेठ मतदार संघातील मोठा व्यापारी वर्ग आहे. त्यांच्यासोबत फडणवीस यांनी चर्चा केली आहे. भाजपकडून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांच्यासोबत मंत्री आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित आहेत. प्रचार सभा आणि स्थानिक पातळीवरील महत्वाचे मुद्दे याशिवाय याच काळात केंद्रीय मंत्री अमित शाह देखील प्रचारासाठी पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे.