PMRDA
sakal
पुणे - गणेशखिंड रस्त्यावरील मेट्रो मार्गिकेखाली सुरू असलेल्या रस्ते विकासकामांचा दर्जा आणि अपूर्ण कामांवरून प्रशासनाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामावर आज (ता. १९) पुणे महापालिकेतील बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या पुणे ग्रँड टूर या सायकल स्पर्धेच्या पूर्वी दुभाजकांच्या कामासह रस्ते समपातळीत आणणे, सुशोभीकरण आदी कामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कामाचा दर्जा चांगला ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.