इको ब्रिक्स'च्या माध्यमातून घरातील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट

Disposal of household plastic waste through Eco Brix
Disposal of household plastic waste through Eco Brix

पुणे : प्लास्टिक कचऱ्याचे विघटन करणे आव्हानात्मक असल्यामुळे पर्यावरणात हा कचरा वर्षानुवर्षे तसाच असतो. मोठ्या प्रमाणात हा कचरा समुद्रात किंवा नद्यांमध्ये आढल्याने पाण्यातील जीवांनाही याचा धोका वाढतो. यावर उपाययोजना म्हणून शहरातील 'पुणे प्लॉगर्स' या संस्थे मार्फ़त 'इको ब्रिक्स'ची मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्लास्टिकच्या विटांचा वापर करून इमारती किंवा फर्निचर बनविण्याचे कार्य केले जाणार आहे. यासाठी घरातील प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर 'इको ब्रिक्स' (प्लास्टिकच्या विटा) बनविण्यासाठी केला जात आहे.

याबाबत माहिती देताना सांथेचे संस्थापक विवेक गौरव म्हणाले, "लोकडाऊनपूर्वीच्या आठ महिन्यात शहरातील विविध भागांमधून प्लास्टिक गोळा करण्यात आला. त्यातील मोठा वाटा हा घरगुती प्लास्टिक कचरा असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात घरातून बाहेर पडणे शक्य नसल्यामुळे 'इको ब्रिक्स' या मोहिमेची सुरुवात केली. त्यामध्ये घरातून निघणार प्लास्टिक कचरा याला साफ करून ते प्लॅस्टिकच्याच बाटली किंवा जारमध्ये भरून त्याचे इको ब्रिक्समध्ये रूपांतर केले जात आहे. तर एक लिटर प्लास्टिकच्या बाटलीत एक ते दीड किलो प्लास्टिक भरले जाऊ शकते. यामुळे सध्या विटांप्रमाणेच या प्लास्टिकच्या विटा पण मजबूत होतात. त्याचप्रमाणे कचऱ्याचेही प्रमाण कमी होत करण्यास मदत मिळते. या कामासाठी सुमारे अडीच हजाराहून अधिक स्वयंसेवकांनी या कार्यात सहभाग नोंदविला असून हे काम सातत्याने सुरू आहे. तसेच इको ब्रिक्सची मोहीम दोन टप्यात पार पडणार आहे.

एक लाख 'इको ब्रिक्स' तयार करण्याचे प्रयत्न
पुणे प्लॉगर्सच्या वतीने डिसेंबर 2020 पर्यंत एक लाख इको ब्रिक्सची निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. तसेच या कामासाठी स्वयंसेवकांची संख्या सुद्धा वाढत असल्याने हा आकडा नक्कीच वेळेत पूर्ण केला जाईल अशी अपेक्षा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अनाथाश्रमातील मुलांसाठी लागणारे साहित्य (फर्निचर) व काही भागांमध्ये स्वच्छता गृह निर्मितीसाठी या इको ब्रिक्सचा वापर केला जाणार असल्याचे विवेक यांनी नमूद केले.

इको ब्रिक्सचे फायदे
- पर्यावरणातील प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी
- सामान्य विटांच्या प्रमाणे यातून देखील मजबूत इमारती तयार करणे शक्य
- घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे शक्य
- विविध आकृती आणि साहित्य बनविण्यासाठी उपयुक्त
- वर्षानुवर्षे टिकू शकणाऱ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com