वीज खंडीत झाल्याने शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

या परिसरात काल पासून पाऊस सुरू झाल्याने विजांच्या कडकडाटामुळे ट्रान्सफॉर्मर पावसामुळे वाहिन्या खराब झाल्याने वीज पुरवठा खंडित झाले होते.

वारजे माळवडी - शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर परिसरातील मंगळवार दुपारनंतर बुधवारी पहाटे पर्यत अनेकवेळा वीज पुरवठा खंडीत झाल्याने येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पाणी पुरवठा देखील विस्कळीत झाला होता.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंगळवारी वीज पुरवठा तीन- चार वेळा अनियमित झाल्याने पुरेसे पाणी जमा झाले नाही. बुधवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा. झाला असे प्राधिकरणाने सांगितले आहे.

या परिसरात काल पासून पाऊस सुरू झाल्याने विजांच्या कडकडाटामुळे ट्रान्सफॉर्मर पावसामुळे वाहिन्या खराब झाल्याने वीज पुरवठा खंडित झाले होते. त्यापूर्वी, कोंढवे- धावडे येथील कुंजाई ओढ्याजवळ कचरा टाकला होता. तो कोणी अज्ञात व्यक्तीने जाळला. जवळच महावितरण ट्रान्सफार्मर आहे. वीज वाहिनी खराब झाल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याची घटना मंगळवारी दुपारी परिसरात घडली. ती आग विझवून महावितरणचे कर्मचारी काम करणार तितक्यात पाऊस आला. त्यामुळे दुरुस्तीचे काम थांबले. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाऊस सुरू झाला. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. परिणामी घरी राहून जे काम करत आहेत. त्यांच्या कामात अडथळा निर्माण झाला होता.

रात्री आठनंतर पहाटे वीज पुरवठा सुरळीत होता. तर पहाटे पाऊस आल्यावर पुन्हा खंडीत झाला होता. त्यानंतर, बुधवारी सकाळी पुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर पुरवठा सुरळीत होता.

 

पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disrupts the water supply due to disconnection of electricity in pune