लॉकडॉऊनमध्ये ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले पुणे पोलिस; अशी केली मदत

Distribution of food packets and food kits for students in northeast India by pune police
Distribution of food packets and food kits for students in northeast India by pune police

पुणे : संचारबंदीमुळे अरुणाचल प्रदेश व ईशान्य भारतातील विद्यार्थी व काही कामगारांची उपासमार सुरू होती. अरुणाचल प्रदेशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही समस्या पुणे पोलिसांसमोर मांडली. त्यानंतर पुणे पोलिसांनी शहरातील दीडशे विद्यार्थी व कामगारांना तत्काळ अन्नधान्य व खाद्यपदार्थ देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य शिक्षण संस्था तसेच शहराच्या वेगवेगळ्या भागात ईशान्य भारत व अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थी, कामगार मोठ्या संख्येने आहेत. मात्र संचारबंदीमुळे त्यांची खाण्यापिण्याची मोठ्या प्रमाणत आबाळ सुरू होती. याबाबत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रशांत लोखंडे यांनी पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्याशी संपर्क साधून त्यांना समस्या सांगितली. डॉ. शिसवे यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन लोखंडे यांनी दिलेल्या पुण्यात वास्तव्यास असलेले ईशान्य भारतातील विद्यार्थी व कामगारांच्या यादीनुसार त्यांच्याशी संपर्क साधला.

- मोठी बातमी : दीड लाख ऊसतोड कामगार मूळगावी परतणार; राज्य सरकारची परवानगी!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य शिक्षण संस्थामध्ये शिकणारे ९४ विद्यार्थी व अन्य कामगार अशा १५० जणांना पुणे सोशल पोलिसिंग या विभागामार्फत तत्काळ अन्नधान्य व खाद्यपदार्थ पोचविले. अन्नधान्य देताना सामाजिक अंतर पाळण्यात आले.

- माजी महापौरांसह 48 जणांना पोलिसांनी बनवला कोंबडा; व्हिडिओ पाहाच
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी त्यांच्या विद्यार्थी व कामगारांना पुणे पोलिसांनी केलेल्या तत्काळ मदतीबद्दल डॉ. शिसवे यांचे मनापासून आभार मानले. खंडू यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली.

"आयएएस' अधिकारी प्रशांत लोखंडे हे माझे बॅचमेट आहेत.त्यांनी ईशान्य भारत व अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांची समस्या सांगितली. त्यानंतर आम्ही तत्काळ १५० विद्यार्थ्याना अन्नधान्य व खाद्यपदार्थ पुरविले. पुणे पोलिसांकडून कर्तव्य भावनेतून व माणुसकीच्या नात्याने ही मदत करण्यात आली आहे."
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस सहआयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com