मंत्र्यांनी पाहिले लग्न सोहळ्यात वऱ्हाडी विनामास्क...मग घेतला हा निर्णय 

डाॅ. संदेश शहा
Wednesday, 1 July 2020

इंदापूर शहरातील शिंदे - पवार यांच्या विवाहासाठी राज्यमंत्री भरणे हे आले होते. या वेळी त्यांनी पाहिले की, अनेक महिलांनी तोंडाला पदर लावलेले होते. त्यामुळे त्यांनी तातडीने

इंदापूर (पुणे) : राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होणारे म्हणून परिचीत आहेत.  इंदापूर शहरातील एका सोहळ्यावेळी त्यांनी वऱ्हाडी विनामास्क असल्याचे पाहून सर्वांना मास्क वाटप केले. तसेच, आयुष्य अनमोल आहे, सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या. शासकीय नियमांचे काटेकोर पालन करा, असा संदेशही दिला.   

सावधान, कोरोनाविषयी मॅसेज फाॅरवर्ड करण्यापूर्वी हे वाचा...
 
३० जून  ही लग्न समारंभाची सर्वात मोठी तिथी होती.  इंदापूर शहरातील शिंदे - पवार यांच्या विवाहासाठी राज्यमंत्री भरणे हे आले होते. या वेळी त्यांनी पाहिले की, अनेक महिलांनी तोंडाला पदर लावलेले होते. त्यामुळे त्यांनी तातडीने नगरसेवक पोपट शिंदे यांना आपल्या गाडीतून मास्क आणायला सांगितले. त्यांनी सर्वप्रथम मंडपात  नवरी मुलगी मोहिनी पवार व नवरा मुलगा मनोज शिंदे यांना मास्क घालण्यास दिले.  त्यानंतर त्यांनी सर्व वऱ्हाडी मंडळींनाही मास्कचे वाटप करण्यासाठी दिले. त्यांच्या या समयसूचकतेचे सर्वांनी जोरदार स्वागत केले.

 कोरोना झाला आमदारांना...ग्रामस्थांचा जीव टांगणीला

या वेळी नगरसेवक पोपट शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चौगुले, अमर नलावडे, सचिन चौगुले, राहुल गुंडेकर, विश्वनाथ पवार, पिंटू घोडके, रामदास चौगुले, रमेश धोत्रे, तुकाराम पवार, माजी नगरसेवक पांडुरंग पवार, मनोज अनंतकर, रुपेश जाधव, सुभाष गायकवाड, धनंजय जाधव आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of masks by Minister Bharane at the wedding ceremony at Indapur