
कडूस गावातील नेहमीचे काही जवळचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या ठिकाणी छोटेखानी मंडप टाकला होता. कार्यक्रमानंतर तीनच दिवसांनी संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांचे धाबे दणाणले. ग्रामस्थांच्या मनात किंचितशी धाकधूक वाढली आहे. संपर्कात नक्की किती आले त्याचा आकडा समजणे कठीण आहे.
कडूस : एका राजकीय पक्षाचे शहर पदाधिकारी व विद्यमान आमदार असलेल्या जिल्ह्यातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर कडूस (ता.खेड) येथील काही जणांचा जीव टांगणीला लागला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होण्याच्या तीन दिवस अगोदर त्यांचा कडूसच्या काही ग्रामस्थांशी संपर्क आल्याची भीती व्यक्त होत आहे. आपल्या नवीन फार्महाऊसच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त ते कडूस येथे येऊन गेले होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पिंपरी चिंचवड शहरातील या बड्या राजकीय प्रस्थाची गेल्या अनेक वर्षांपासून कडूसला ये-जा असते. त्यांनी परिसरात अनेक मित्र व कार्यकर्ते जोडले आहेत. शहरातून ते आले की त्यांच्या भेटीला नित्यनेमाने धाव घेणारे अनेक जण गावात आहेत. गेल्या चार महिन्यांपासून कडूस येथील कुमंडला नदीवरील बंधाऱ्यालगत त्यांचे जमीन सपाटीकरण व जमिनीच्या विकासाचे काम सुरू आहे. या ठिकाणी त्यांना नवीन फार्महाऊस बांधायचे आहे. शहरातून देखरेखीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांची मोठी रेलचेल असते. मागील आठवड्यात या कामाचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमाला ते स्वतः कुटुंबासमवेत हजर होते. शहरातून काही कार्यकर्ते सुद्धा आले होते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कडूस गावातील नेहमीचे काही जवळचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या ठिकाणी छोटेखानी मंडप टाकला होता. कार्यक्रमानंतर तीनच दिवसांनी संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांचे धाबे दणाणले. ग्रामस्थांच्या मनात किंचितशी धाकधूक वाढली आहे. संपर्कात नक्की किती आले त्याचा आकडा समजणे कठीण आहे. संपर्कात आलेल्यांनी विशेष काळजी घेण्याचे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. अगोदरच कडूसमध्ये सहा पॉझिटिव्ह सापडले आहेत. ते सर्व बरे होऊन घरी परतले आहेत. पण कोरोनाची धास्ती ग्रामस्थांच्या मनात कायम आहेच. त्यातच या घटनेमुळे आणखी भीती वाढली आहे. याबाबत एका कार्यकर्त्याने सांगितले, 'दादा आले होते. घरगुती कार्यक्रम होता. पण ते कोणाच्याही जवळ आले नाही किंवा कोणीही त्यांच्या जवळ गेले नाही. त्यांनी व उपस्थितांनी काळजी घेतली होती. लांबूनच हाय-बाय केले. कार्यक्रम झाला आणि ते लगेच निघून गेले.'
पुण्यात अर्ध्या तासात कोरोना चाचणी; महापालिकेकडे एक लाख किट उपलब्ध
पुणे : हवेलीत रुग्णांची संख्या पोहोचली 170 वर...