esakal | कोरोना योध्यांच्या सुरक्षेसाठी बारामतीतील 'या' कंपनीने घेतला पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

baramati.jpg

कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य व पोलिस विभागाच्या सहका-यांच्या सुरक्षिततेसाठी चॉकलेट निर्मिती करणाऱ्या फेरेरो इंडिया प्रा. लि. कंपनीने सातशेहून अधिक पीपीई किट व फेस शिल्ड मास्कचे आज वाटप केले.

कोरोना योध्यांच्या सुरक्षेसाठी बारामतीतील 'या' कंपनीने घेतला पुढाकार

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य व पोलिस विभागाच्या सहका-यांच्या सुरक्षिततेसाठी चॉकलेट निर्मिती करणाऱ्या फेरेरो इंडिया प्रा. लि. कंपनीने सातशेहून अधिक पीपीई किट व फेस शिल्ड मास्कचे आज वाटप केले. कंपनीने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविल्याचे फेरेरोच्या वतीने प्लँट एचआर विभागाचे प्रमुख उमेश दुगाणी यांनी यावेळी सांगितले.

पुण्यात आरटीओचे कामकाज पूर्ववत होणार

या प्रसंगी रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे प्रमुख मास्सीमो मॉर्गन्टी, इमसोफर कर्मचारी संघटनेचे प्रमुख बाळासाहेब डेरे, कृपा राय, योगेश मगदूम, प्रशांत काळभोर, महा संस्थेचे विजय वरुडकर तसेच उद्योजक रवींद्र काळे, एमआयडीसीचे अभियंता स्वप्नील जगताप हे उपस्थित होते. आज रुई येथील कोविड केअर सेंटरला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील दराडे यांच्याकडे हे किट सुपूर्द करण्यात आले. येथे या पीपीई किटची सर्वाधिक गरज होती.

झेडपीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून शिक्षक करतात असं काही

फेरेरोने दिलेल्या या मदतीबद्दल खोमणे व दराडे यांनी कंपनीप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते व पोलिस निरिक्षक अण्णासाहेब घोलप यांच्याकडेही आज फेस शिल्ड मास्क व पीपीई किट प्रदान केले गेले. त्यांनीही कंपनीच्या उपक्रमाची प्रशंसा केली. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातही डॉ. सदानंद काळे यांच्याकडे मास्क आणि पीपीई किट सुपूर्द करण्यात आले.