Pune News : औषध वितरकाला चार कोटींचा गंडा; दुबईला निर्यातीच्या बतावणीने दोघांकडून फसवणूक
Pharma Fraud : दुबईला औषध निर्यातीच्या बहाण्याने पुण्यातील औषध वितरकाची तब्बल चार कोटी ४० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : दुबईला निर्यातीच्या बतावणीने औषधे घेऊन वितरकाची चार कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.