esakal | कोरोना मृत्युदर कमी करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना 
sakal

बोलून बातमी शोधा

District Administration is taking Measures to Reduce Corona Mortality after Deputy Chief Minister Order.jpg

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी महसूल आणि आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. कोरोनाचा वाढता रुग्णदर कमी करण्यासाठी रुग्णांवर वेळेत व योग्य उपचार करून मृत्युदर कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली.

कोरोना मृत्युदर कमी करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्युदर कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय सेवा-सुविधांबाबत आढावा घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्युदर वाढत असल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यासोबतच आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी महसूल आणि आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. कोरोनाचा वाढता रुग्णदर कमी करण्यासाठी रुग्णांवर वेळेत व योग्य उपचार करून मृत्युदर कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली.

- चीनी कंपन्यांची घुसखोरी थांबविण्यासाठी सरकारने काय केला बदल ते वाचा?

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांच्यासाठी आवश्यक पीपीई किट, एन ९५ मास्क, सर्जिकल मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, औषधसाठा, बरे झालेल्या रुग्णांना घरापर्यंत पोचवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रुग्णदर व मृत्युदर कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात तसेच रुग्ण आढळलेल्या ग्रामीण भागात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. नागरिकांनी घरी राहणे आवश्यक असून, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
लॉकडाऊन काळात जिल्ह्यात अडकलेल्या प्रवासी व कामगारांसाठीचे निवारा कॅम्प, भोजन व्यवस्था, रेशन धान्य वितरण याबाबतही त्यांनी आढावा घेतला.

Coronavirus : दिलासादायक ! देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त

स्वॅब चाचणी निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तींना घरी पोचण्यासाठी पीएमपीएमएलच्या बसेस वापरता येतील. बसचालकांना मास्क देण्याबरोबरच वेळोवेळी बसचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे, अशा सूचना राम यांनी दिल्या.

loading image