
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जात नव्हती. मात्र, आता काही अटी व शर्तींचे पालन करून ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनाच बैठकीसाठी उपस्थित राहता येणार आहे.
ग्रामसभा शक्यतो मोकळ्या जागेत घेण्यात यावी. तोंडास मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे, अशी बंधने घालण्यात आली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रत्येक महिन्यात मासिक सभा घेतली पाहिजे, अशी सभा घेण्यास सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच यांनी कसूर केल्यास त्यांना अपात्र ठरविण्याची तरतूद ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आहे. परंतु, याबाबत सभा न घेण्यासाठी पुरेसे कारण होते किंवा नव्हते. या प्रश्नावरील जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल, अशी तरतूद कलम 36 मध्ये आहे.
सद्यःस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांतर्गत जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जमावबंदीचे काटेकोर पालन करत असताना ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जात नव्हती.
...तर गुन्हे दाखल होणार
मासिक सभा घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे बंधनकारक आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार दंडात्मक तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही संबंधित पोलिस अधिकारी यांनी करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.