बाप रे ! देशात कोरोनावाढीचा सर्वाधिक वेग पुण्यात ; केंद्रीय पथकाचा अहवाल काय सांगतोय पाहा!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

देशाच्या इतर भागातील तुलनेत हा वेग जास्त असल्याचेही निरीक्षणही यात नोंदविण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाबाचे रुग्ण, मधुमेह, हृदय आणि मूत्रपिंड विकार असे रुग्ण जोखमीचे आहेत. त्यांना झालेला कोरोनाचा संसर्गाचे लवकर निदान होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी तपासण्या वाढविणे, सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात वाढ करणे, असे उपाय या केंद्रीय पथकाने सुचविले आहेत. 

पुणे : देशातील कोरोनाचा सर्वाधिक वेगाने फैलाव पुण्यात होत असल्याचे केंद्रीय पथकाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. देशातील उद्रेक झालेल्या हॉटस्पॉटमध्ये केद्रीय पथाकाने दौरे केले. त्यात महाराष्ट्रातील मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती येथे पाहणी केली. या पथकाने निवासी छावण्या, भाजी मार्केट येथे कशा पद्धतीने कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी यंत्रणा राबिण्यात येत आहे. त्याची माहिती घेण्यात आली होती. त्याच बरोबर महापालिकेचा नियंत्रण कक्ष, महापालिकेची रुग्णालये, सरकारी रुग्णालयांनी व्यवस्थेची माहिती यात घेण्यात आली. त्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आल आहे. त्यात पुण्यात रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग सात दिवस असल्याचे दिसून आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशाच्या इतर भागातील तुलनेत हा वेग जास्त असल्याचेही निरीक्षणही यात नोंदविण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाबाचे रुग्ण, मधुमेह, हृदय आणि मूत्रपिंड विकार असे रुग्ण जोखमीचे आहेत. त्यांना झालेला कोरोनाचा संसर्गाचे लवकर निदान होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी तपासण्या वाढविणे, सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात वाढ करणे, असे उपाय या केंद्रीय पथकाने सुचविले आहेत. 

- कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचयं? करियर आणि बिझनेसमध्ये 'या' आहेत संधी

या बाबत "सकाळ'शी बोलताना महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, "पुण्यात दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग 4.5 दिवस होता. तो आता सात दिवसांवर जात आहे. हा वाढीचा वेग नऊ दिवसांपर्यंत कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहेत.''

 तंबाखुमुळं खरच कोरोना पळून जातो? वाचा शास्त्रज्ञांचे म्हणणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus growth rate is highest in Pune