
पुणे : जिल्हा परिषदेत असलेल्या हिरकणी कक्षाच्या धर्तीवर आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी महिलांसाठी हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने ‘आदर्श हिरकणी कक्ष मॉडेल’ तयार केले आहे, त्या आधारे सर्व ठिकाणी कक्षाची उभारणी केली जाणार आहे.