

Dive Ghat road Closed
esakal
पुणे - हडपसर ते दिवेघाट दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी दिवेघाट परिसरात बुधवारी (ता. ३०) 'ब्लास्टिंग' (दगड फोडण्यासाठीचा स्फोट) करण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून दुपारी १२ ते दुपारी दोन वाजेपर्यंत दिवेघाटातील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.