

Alandi Students Die In Diveagar Tragedy As Families Face Deep Grief And Dreams Of Their Childrens Future End
esakal
- विलास काटे
आळंदी : नवरात्र उत्सवानिमित्त आळंदी पोलिसांनी पोलीस पाटलांची बैठक बोलावली होती. त्याचवेळी दिवेआगर येथील दुर्घटनेची माहिती पोलिसांना मोबाईलवर मिळाली. यावेळी केळगाव येथील विद्यार्थी राजवीर वहीले याचे वडील युवराज वहीले हे पोलीस ठाण्यातच बैठकीसाठी उपस्थित होते. ही खबर ऐकताच युवराज वहीले सुन्न झाले. एकुलता एक मुलगा दुर्दैवी घटनेत गेल्याचे दुःख त्यांना पचवताच आले नाही. पोलीस ठाण्यातील वातावरण या दुःखद घटनेने पिळवटून निघाले.