पुणे नगर हायवे वरील डिव्हायडर हटवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे नगर हायवे

पुणे नगर हायवे वरील डिव्हायडर हटवला

रांजणगाव : खंडाळे ( ता. शिरूर ) येथील पुणे नगर महामार्गावरील डिव्हायडर खुला करावा असे वृत्त दैनिक सकाळ मध्ये प्रसारीत झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने कारवाई करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल सोयीस्कर पद्धतीने बाजारपेठेत नेता येणार आहे. यामुळे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

पुणे नगर महामार्गावरील हॉटेल, पेट्रोलपंप व अन्य ठिकाणी तोडण्यात आलेले गतिरोधक गेल्या आठवडयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बंद करण्यात आले होते. त्यामुळे खंडाळे (ता. शिरूर ) येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना पुणे नगर महामार्गावरुन रस्त्याला ये - जा करण्यासाठी खंडाळे गाव प्रवेशद्वार आणि गणेगांव खालसा चौक रस्त्याने विरुद्ध दिशेने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता.

हेही वाचा: कॅनडाने भारतातील प्रवाशांवरील उठवली बंदी; पुन्हा सुरू होणार विमानसेवा

स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आंबेगाव शिरुर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या मार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मुंबई येथे भेटून निवेदन दिले. या बाबत दैनिक सकाळ ने वृत्त प्रसारीत केले होते. त्याचा परीणाम म्हणून वळसे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना गतिरोधक काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर शनीवार (ता. २५ ) ग्रोवेल कंपनीसमोरील गतिरोधक काढून टाकण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

loading image
go to top