कोरोना विरुद्धच्या लढ्यात विभागीय आयुक्तांनी उचलला खारीचा वाटा; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आर्थिक मदत!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी (ता.३०) झालेल्या कोरोना प्रतिबंधक आढावा बैठकीत हा धनादेश सुपूर्त करण्यात आला.

पुणे : कोरोना विरुद्धच्या लढ्यात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला. विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी (ता.३०) झालेल्या कोरोना प्रतिबंधक आढावा बैठकीत हा धनादेश सुपूर्त करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे या वेळी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divisional Commissioner Dr Deepak Mhaisekar donates Rs 51000 to CM Assistance Fund