ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक यांच्यावर आता 'ही' जबाबदारी: विभागीय आयुक्त यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

- ग्रामीण भागात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करा
- विभागीय आयुक्त यांचे निर्देश
- ग्रामसेवक, तलाठी,  आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित 

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी ग्रामीण भागात बाहेरुन प्रवास करुन येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे. यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही, याची गाव पातळीवर दक्षता घ्यावी. ग्रामसेवक, तलाठी किंवा आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेतला. या वेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
 
दिलीप बंड म्हणतात, विद्यापीठ रस्त्यावरील तीनही पूल पाडणे योग्यच

कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची ही खऱ्या अर्थाने कसोटीची वेळ आहे. महापालिकेसह इतर यंत्रणांमार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी करून गतीने उपचार सुरू करावेत. यासोबतच ग्रामीण भागातही कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करावे. आरोग्य सर्वेक्षण अचूक असावे.

 Big Breaking : पुणे विद्यापीठ चाैकातील ते दोन पूल पाडण्याबाबत झाला मोठा निर्णय

ग्रामीण भागामध्ये बाहेरुन जे प्रवासी, मजूर, विद्यार्थी अथवा इतर कोणताही नागरीक प्रवेश करेल, या सर्व नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करावे, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. 
 

रेल्वेच्या जागेवरील झोपडीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य रेल्वेने 'एसआरए' दिल्या 'या' सुचना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divisional Commissioner gives Instructions to isolation of outsiders Citizen in rural areas