पुण्यात शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊनबाबत प्रशासनाने दिले स्पष्टीकरण; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

पी वन पी टू बद्दल निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.

पुणे : शहरात आठवड्यातून शनिवारी आणि रविवारी दोन दिवस लॉकडाऊन करण्याबाबत कोणताही विचार नाही, अशी माहिती विभागीय विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी शुक्रवारी (ता.३१) पत्रकार परिषदेत दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात १३ ते २३ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. हा कालावधी संपल्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोनाचा संसर्ग आणि बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध लावावे लागतील, असे सांगितले होते. त्यावर व्यापारी संघटनांनी पी वन पी टू चा निर्णय रद्द करून आठवड्यातून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी राम यांच्याकडे केली होती. 

क्व्यारंटाइनमध्ये घ्या पौष्टीक आहार; जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना​

या संदर्भात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांची वेगवेगळी मागणी असून, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे राम यांनी नुकतेच सांगितले होते. 

या संदर्भात राव म्हणाले, शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनबाबत व्यापाऱ्यांची सशर्त मागणी होती. पी वन पी टू बद्दल निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यामुळे सध्यातरी शनिवार आणि रविवार या दिवशी लॉकडाऊन करण्याचा विचार नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divisional Special Operations Officer Saurabh Rao declared about there are no plan of two days lockdown in week